हा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी; झुपकेदार शेपटी पाहून ओळखता येतंय का?
तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे?
भीमाशंकरच्या अभयारण्यांना या राज्य प्राण्याचं घर म्हटलं जातं.
आश्चर्याची बाब म्हणजे हा प्राणी म्हणजे एका समृद्ध अभयारण्याचं प्रतीक. त्यामुळं तुम्हाला तो कुठंही दिसल्यास ती भूमी प्रचंड समृद्ध आहे असंच म्हणावं लागेल.
गर्द झाडीत असला तर सहजासहजी नजरेस येणार नाही, पण समोर येताच तुम्हाला थक्क करणारा हा प्राणी म्हणजे शेकरू.
indian gaint squirrel हे त्याचं इंग्रजी नाव. आता अंदाज आलाच असेल ही हा खारुताईचाच एक प्रकार.
झुपकेदार शेपूट असणारा हा प्राणी विदर्भात पहाडी खार म्हणून ओळखला जातो.
हा सस्तन प्राणी शाकाराही आणि मांसाहारी असून, त्याला एकट्यानं जीवन व्यतीत करण्यात आनंद मिळतो.
जन्मत: अंध असणारा हा प्राणी 32 किमी वेगानं पळू शकतो. त्याचे डोळे मोठे असल्यामुळं इतर प्राण्यांपासून त्याला सहज स्वत:चं संरक्षण करता येतं.
‘रतुफा इंडिका’ हे या प्राण्याचं वैज्ञानिक नाव असून, देशभरात त्याचा सर्वाधिक अधिवास महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही आढळतो.