वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना त्यांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
थकवा येणे, मळमळ होणे, ताप येणे असा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
तीव्र उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या. प्रकृती अस्वास्थ्य असल्यास डॉक्टरांकडून घेऊन उपचार सुरु करा.
उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. सौम्य रंगांना प्राधान्य द्यावं.
भरपूर पाणी प्यावे, बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय.
राज्यात वाढता उकाडा पाहता नागरिकांना आरोग्य विभाग आणि महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.