महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण जवळपास महाबळेश्वर इतक्याच उंचीवर आहे. हे पावसाळ्यात फारच मोहक दिसते.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं लोणावळा-खंडाळा ही पर्यटनस्थळं थंड हवेची ठिकाणं असून ती पावसाळ्यात सदैव धुक्यात हरवलेली असतात.
म्हैसमाळ हे भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
चिखलदरा अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात फिरायला जाण्याचा वेगळाच आनंद मिळतो.
आंबोली घाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे कोल्हापूर ते सावंतवाडीच्या वाटेवर आहे. या घाटात मुसळधार पाऊस पडल्यानंतर आजूबाजूला घनदाट जंगल, धबधबे असं दृष्य पाहायला मिळतं.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूटांवर असून पावसाळ्यात इथलं वातावरण फारच मस्त असतं.
मुंबई तसेच पुण्यापासूनही हाकेच्या अंतरावर असलेलं महाबळेश्वर पावसाळ्यामध्ये फारच मनमोहक दिसतं. तुम्ही यापूर्वी इथं गेला असाल तर पावसळ्यात इथं आवर्जून जा.