परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या पूर्वीच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने मुंबईकर हैराण झाले आहेत.
मात्र मुंबईत सर्वाधिक तापमान का वाढते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
मुंबईत आकाश निरभ्र असते उष्णता अधिक जमिनीवर पोहोचते त्यामुळं हवा कोरडी असते.
आर्द्रता कमी होऊन 70 टक्क्यांपर्यंत येते. कमाल तापमान 30 ते 34 अंशापर्यंत जाते.
दिवसाचे 12 तास पूर्ण उष्णता असते. त्यामुळं उकाड्यात अधिक वाढ होते.
किनारपट्टीवरुन वाहणारे खारे वारे संथ झाल्यामुळं समुद्राचा थंडावा उशिरा मुंबईच्या भूभागावर पोहोचतो.