अग्निशमन विमोचक/फायरमन (200 पदे) या पदावर सर्वाधिक भरती करण्यात येईल.
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इन्स्पेक्टर (40 पदे), वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर (3 पदे), औषधनिर्माता (15 पदे), पशुधन पर्यवेक्षक (लाइव्ह स्टॉक सुपरवायझर) (1 पद) ही पदंही रिक्त आहेत.
पशुवैद्यकीय अधिकारी (2 पदे), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सीनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/, विभागीय आरोग्य निरीक्षक (20 पदे), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (10 पदे) या पदांसाठीसुद्धा अर्ज करता येणार आहे.
नोकरीसाठी तुम्ही क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (8 पदे), वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी (20 पदे), उपसंचालक (प्राणिसंग्रहालय) (1 पद) असे अर्ज करु शकता.
आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन या विभागांतील पदांसाठी ही भरती असणार आहे.
पुणे पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-1 ते वर्ग-3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.