ठाण्यात राहणाऱ्या 99 टक्के लोकांना ठाणे शहराचे जुने नाव माहित नसेल.
मुंबईच्या जवळ असलेले ठाणे शहर झपाट्याने विकसीत होत आहे. ठाण्यात घरांच्या किंमती देखील वाढल्या आहेत.
ठाणे शहराचा इतिहास प्राचीन आहे. तलावांचे शहर अशी देखील ठाण्याची ओळख आहे.
ठाणे शहराचे प्राचीन नाव श्रीस्थान असे होते.
मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात याचा ठाण्याचा श्रीस्थान असा उल्लेख आढळतो.
कालांतराने श्रीस्थानकाचे नाव तानाह, ठाणा आणि ठाणे असे बदलत गेले.
ठाणे शहरात शिलाहार काळातील अप्रतिम कलाकुसर असलेल्या देवतांच्या मूर्तींचे अवशेष वगळता इतर कोणतेही स्थापत्य दिसून येत नाही.