'या' गड किल्ल्यांना नक्की द्या भेट!
धोडप किल्ला हा नाशिक जिल्हयातील एक किल्ला आहे. पावसाळ्यात या कि्ल्ल्यावर मोठी गर्दी दिसून येते.
हर्षगड किल्ला म्हणून ओळखीत असलेला हरिहर किल्ला ट्रेकर्ससाठी खास आकर्षक आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील भव्य दिव्य किल्ला नक्की ट्रेकिंगसाठी वेगळा अनुभव घेऊन देतो.
नावाप्रमाणेच बलाढ्य असा प्रतापगड सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी महत्त्वाचा किल्ला आहे.
पुणे जिल्ह्यातील हमखास फिरता करावा असा लोहगड किल्ला सर्वांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हाताला येतील एवढ्या अंतरावरील ढग हा क्षण फोटोग्राफीसाठी खास ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड. पावसाळ्यात खास ट्रेकिंगसाठी हा किल्ला निवडला जातो. तुम्हीही नक्की ट्रेक केला पाहिजे.
तोरणा किल्ला स्वराज्याला जोडला गेलेला पहिला किल्ला होता. सर्वात सोप्पा आणि लहान मुलांसह फिरण्यासाठी हा किल्ला मानला जातो.
तिकोना किल्ला हा पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वात सोईचा किल्ला मानला जातो. उंचीवरून दिसणारा हिरवागार परिसर डोळ्याचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही.
भंडारदऱ्यापासून 23 किमी अंतरावर असलेला रतनगड हा महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या शेवटी या किल्ल्याला अनेकजण भेट देत असतात.
हरिश्चंदगड असा भव्यदिव्य किल्ला हा सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक मानला जातो. कोकणकडा हा या किल्ल्याचं विशेष वैभव. पावसाळ्यात कोकणकड्यावरून पायाखाली दिसणारे ढग वेगळीच अनुभुती दर्शवतात