एकदोन नव्हे तर तब्बल 6 प्रकारचे असतात किल्ले; तुम्हाला यापैकी किती ठाऊक?
धनदुर्ग, म्हणजे एखादा असा किल्ला/ दुर्ग ज्याच्या आजुबाजूला 20 कोसांपर्यंत एकाही घरात पाल नाही. म्हणजेच तेथील प्रजा श्रीमंत आहे.
महीदुर्ग/ महादुर्ग म्हणजे असा किल्ला 12 हातांपेक्षा अधिक उंच, खिडक्या असणाऱ्या तटबंदी आहेत. युद्धाचा प्रसंग आला तर त्या तटबंदीवरून पहारेकऱ्यांना व्यवस्थित फिरता येईल अशी सोय इथं असे. देवगिरीचा किल्ला हे त्याचं उदाहरण.
अब्ददुर्ग किंवा जलदुर्ग हा दुर्गांचा असा एक प्रकार जो चारही बाजुंनी पाण्यानं वेढलेाला आहे. कोकणकिनारपट्टीवर अशा अनेक जलदुर्गांची अभेद्य भींत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारली आहे.
वाक्ष्रदुर्ग हा दुर्गांचा असा प्रकार ज्याच्या तटाच्या बाहेर चहूबाजुंना चार कोसांपर्यंत मोठे वृक्ष, काटोरी झाडंझुडपं, घनदाट वनं यांचा वेढा असतो. कमळगड , वासोटा हेच ते वाक्षदुर्ग.
नृदुर्ग हे असे काही किल्ले, ज्याभोवती गज, अश्व, रथ अशा सैन्यांचा पहारा असतो.
गिरीदुर्ग हा दुर्गांचा आणखी एक प्रकार ज्यावर चढण्यासाठी चिंचोळा मार्ग आणि अवघड वाट असते, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असे अनेक गिरीदुर्ग आढळतात. (माहिती संदर्भ- अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर)