स्मार्टफोनही कालबाह्य होतात का? हा प्रश्न तुमच्याही मनात येईल. पण सत्य हे आहे की प्रत्येक गोष्टीची काही ना काही एक्सपायरी डेट असते.
ज्याप्रमाणे तुमची कार, बाईक आणि औषध यांची एक्सपायरी डेट असते. त्याचप्रमाणे तुमच्या फोनचेही ठराविक वेळेनंतर आयुष्य संपते.
ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये ते म्हणजे तुमच्या फोनची एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेटपासूनच सुरू होते. म्हणजे, तुम्ही फोन कधी खरेदी करता त्याला अर्थ उरत नाही.
तुमचा फोन कधी बनवला गेला यावरही एक्सपायरी डेट अवलंबून असते. वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या एक्सपायरी डेट वेगवेगळ्या असतात.
दरम्यान, स्मार्टफोन उत्पादक प्रत्येक फोनला ठराविक कालावधीसाठी अपडेट देतात. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर फोन वापरणं अपेक्षित असतं.
जर अपडेट संपल्यानंतर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर हॅकर्स तुमचा मोबाईल हॅक करु शकतात
तुमच्या फोनची एक्सपायरी डेट तो तयार केल्याच्या तारखेपासून सुरू होते. तुम्ही तुमच्या फोनच्या निर्मितीची तारीख त्याच्या बॉक्सवर पाहू शकता.
तुम्ही Endoflife.date ला भेट देऊन तुमच्या डिव्हाइसची एक्सपायरी तारीख देखील तपासू शकता. मात्र सर्व ब्रँडचे तपशील यावर उपलब्ध नाहीत. (सर्व फोटो - freepik.com)