बांद्रे येथील माऊंटमेरी चर्च हे मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध चर्च आहे. आकर्षक बांधकाम हे या चर्चचे वैशिष्ट्य आहे.
हाजीअली दर्गा हा समुद्रात बांधण्यात आला आहे. फक्त मुस्लीमच नाही तर सर्व धर्मीय भाविक हाजीअली दर्ग्याला भेट देतात.
वाळकेश्वर परिसरात बाबुलनाथ मंदिर आहे. बाबुलनाथ हे महादेवाचे रुप मानले जाते. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
मुंबादेवी हे मुंबईचे कुलदैवत मानले जाते. दक्षिण मुंबईत अत्यंत गजबजलेल्या परिसरात मुंबादेवीचे मंदिर आहे.
महालक्ष्मी हे देखील मुंबईतील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. भाविक मोठ्या संख्येने महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असतात.
सिद्धीविनायक हे मुंबईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दादर जवळील प्रभादेवी येथे हे मंदिर आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
गजबजलेल्या मुंबईतील तीर्थक्षेत्र