गोरेगावमधील आरे मिल्क कॉलनीतील छोटा काश्मीर ही कपलसाठी सुंदर जागा आहे. इथे कपल नौकाविहारचा आनंद घेऊ शकता. शांत आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे.
संजय गांधी पार्क हे बोरीवलीजवळ आहे. अनेक जोडप्यांना या ठिकाणी जायला आवडतं. जंगल सफारी आणि एकांत, शांतता यामुळे अनेक जोडप्यांना इथे जायला आवडतं. हा मुंबईकरांसाठी सगळ्यात जवळचा पिकनिक स्पॉट आहे.
हे मलबार हिलमधील प्रसिद्ध पार्क आहे. हिरवळ आणि आकर्षक दृष्यांसाठी हे गार्डन ओळखलं जातं. जोडप्यांची या पार्क जास्त पसंती आहे.
जुहू बीच हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय बीचपैकी एक आहे. इथे कपल एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसून येतात. संध्याकाळच्या वेळी समुद्र किनारी बसून सुर्यास्त पाहण्याचा आनंदच काही औरच असतो.
मलबार हिल परिसरातील हँगिंग गार्डन आहे. हे मुंबईतील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. सगळीकडे सुंदर अशी हिरवळ आहे.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बोट राइडचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचे दृश्यही अनेक जोडप्यांना आकर्षित करत असतात.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खूप मजा करायची असेल, तर प्रसिद्ध मनोरंजन पार्क एस्सेल वर्ल्ड सर्वोत्तम आहे. एस्सेल वर्ल्डमध्ये, तुम्ही क्रेझी कप, कॅटरपिलर, अॅडव्हेंचर अमेझोनिया विथ हुला लूप आणि व्हाइट-ए-कोस्टर यासारख्या मजेदार राइड्सचा आनंद घेऊ शकता.
बँडस्टँड हे वांद्रेमधील समुद्र किनाऱ्यावर एक रॉक वॉक आहे. हे ठिकाण हँगआउट स्पॉट आणि जॉगर्स पार्क म्हणूनही ओळखला जातो. येथे दररोज मोठ्या संख्येने जोडपी पाहायला मिळतात.
एलिफंटाची गुहा 60 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडप्याचा इतिहास जाणून घेण्यात रस असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एलिफंटा लेण्यांमध्ये जाऊ शकता. तुम्ही ट्रेकिंगसारख्या उपक्रमांचाही आनंद घेऊ शकता.
मरीन ड्राईव्ह हे मुंबईकरांपासून पर्यटकांपर्यंत सगळ्यांची पहिली पसंत आहे. या ठिकाणी कायम प्रेमात बुडलेल्या जोडप्यांचा मेळा दिसून येतो. मरीन ड्राइव्हला सुंदर सूर्यास्त पाहत तु्म्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत मुंबईतील सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणी कुठे जायचं आहे कळतं नाही आहे. मग मुंबईतील काही रोमँटिक ठिकाणांची माहिती देणार आहोत.