पुढचे दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला असल्याने अवकाळी पाऊस होणार आहे.
ऑक्टोबर हिटपासून त्रस्त झालेल्यांना मुंबईकरांना पावसाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. रविवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळीमुळे मुंबईकरांना थंडीसोबत पावसाचाही आनंद मिळाला.
भारतीय हवामान खात्याने मुंबईत 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे या शहरांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मुंबईत पहाटेच्या सुमारास घाटकोपर, विद्यावीहार, कुर्ला, सायन, माटुंगा या परिसरात मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली होती.
तर दुसरीकडे, पश्चिम उपनगरात अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
या पावसामुळे मध्यरात्रीपासूनच अंधेरी ते दहिसरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाट चालूच होता.
पावसासह आलेल्या जोरदार वादळामुळे सात बांगला परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरावरील पत्रेही उडाले. त्यामुळे काही घरांचे नुकसान देखील झाले.