पारद शिवलिंग वास्तूत असणं शुभ मानलं गेलं आहे. अक्षय्य तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधीवत पूजा करा. त्यामुळे भगवान शिवांची कृपा राहते आणि वास्तुदोष दूर होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
श्रीयंत्र अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मातेच्या मंत्रोच्चारांप्रमाणेच तिच्या यंत्राची पूजा करणेही खूप फलदायी मानले जाते. श्रीयंत्राच्या दर्शनाने साधकाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते.
एकाक्षी नारळही शुभ मानला जातो. या दिवशी हा एकाक्षी नारळ घरी आणला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यामुळे आर्थिक संकट दूर होतं.
लक्ष्मी देवीच्या हातात असलेला दक्षिणामुखी शंख धनदायक मानला गेला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला दक्षिणमुखी घरी आणा. यामुळे घरात सकारत्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिती चांगली राहते.
देवी लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी कवडी जरूर विकत घ्या. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची पूजा करुन काही वस्तूंची खरेदी करणे शुभ मानलं जातं. सोनं, चांदी शिवाय या इतर वस्तूही आणल्या तर घरात सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला म्हणजे 22 एप्रिल 2023 ला शनिवारी या वस्तू नक्की आणा.
अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त सकाळी 7:49 मिनिटांपासून दुपारी 12:21 मिनिटांपर्यंत असेल.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल 2023 ला सकाळी 7:49 मिनिटांनी सुरु होईल. तृतीया तिथी समाप्ती 23 एप्रिल 2023 ला सकाळी 7:47 मिनिटांपर्यंत असणार आहे.