सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर काही गोष्टी वर्ज्य आहेत. ही कामं केल्यास दु:ख आणि दारिद्र्य येतं असं मानलं जातं.

Aug 05,2023

क्षणात निघून जाईल हातातला पैसा

शास्त्रानुसार, संध्याकाळी वातावरणा नकारात्मक ऊर्जा असते. यामुळे काही कामं सूर्यास्तानंतर अजिबात केली जाऊ नयेत.

झाडू मारणे

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर झाडू मारणं योग्य नाही असं मानलं जातं. असं केल्याने लक्ष्मी नाराज होते आणि त्या घऱातून सुख, शांतता निघून जाते.

संध्याकाळी झोपू नये

संध्याकाळी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा घरात प्रवेश करतात. जर एखादी व्यक्ती त्यावेळी झोपली असेल तर त्याला या देवींचा आशीर्वाद मिळत नाही.

आजार

याशिवाय संध्याकाळी झोपणाऱ्यांना अनेक आजारही होतात.

कपडे धुणं किंवा सुकवणं

मान्यतेनुसार, संध्याकाळी कपडे धुणं किंवा सुकवणं टाळलं पाहिजे.

घरात नकारात्मक ऊर्जा

सूर्यास्तानंतर वातावरणात सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा असते. अशा स्थितीत ती कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि कपड्यांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात.

दूध, दही, पनीर आणि मीठ

सूर्यास्तानंतर दूध, दही, पनीर आणि मीठ दान करु नये असंही सांगितलं जातं. असं केल्यास आपल्या घरातील सुख समृद्धी दुसऱ्याच्या घऱात जातात.

तुळशीची पानं तोडू नका

शास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर तुळशीच्या पानांना हात लावणं किंवा तोडणं टाळा. असं करणं अशुभ मानलं जातं.


ही माहिती ज्योतीष, पंचांग, प्रवचन, धार्मिक मान्यतासह विविध माध्यमातून घेण्यात आली आहे. या माहितीची विश्वसनियता तुम्हीदेखील तपासा.

VIEW ALL

Read Next Story