घराच्या 'या' दिशेला लावा प्रभू श्रीरामाच्या नावाचा दिवा

Jan 22,2024

अयोध्येत आज अखेर रामलल्ला विराजमान झाले आहेत.

दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला असताना आज श्रीरामाच्या नावे दीप प्रज्वलित करायला हवा.

दिवा लावण्यासाठी सूर्यास्तानंतर सर्वात चांगली वेळ आहे.

सूर्यानंतर तुपाचा एक दिवा लावा आणि प्रभू श्रीरामाच्या नावाचं स्मरण करा.

श्रीराम ज्योती तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला प्रज्वलित करा. बाजूला चांगली रांगोळीही काढा.

गहू किंवा तांदूळ खाली ठेवा आणि त्यावर दिवा ठेवून दीप प्रज्वलित करा. त्या दिव्याचं तोंड पूर्व किंवा प्रभू रामाच्या फोटोकडे असलं पाहिजे.

जर हा दिवा रात्रभर अखंडपणे प्रज्वलित होत राहिला तर यामुळे कल्याण आणि भरभराट होईल.

दीप प्रज्वलित केल्यानंतर प्रभू श्रीरामाचं गुणगान गा. तुलसीदास यांनी विनय पत्रिकेत भगवान रामाचं गुणगान गायलं आहे. तसंच नावाचं स्मरण करा.

यानंतर रामाची आरती करा आणि प्रसाद वाटप करा.

VIEW ALL

Read Next Story