काळा धागा अंगठ्याला बांधल्यास काय होतं?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत. पण पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास काय फायदा होतो ते जाणून घ्या.
शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी काळा धागा बांधण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो असं म्हणतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात, असं म्हटलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास नकारात्मक शक्तीच्या प्रभावापासून आपलं संरक्षण होतं.
महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधावा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार डाव्याला पायाला धागा बांधणे शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी महिलांनी पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधावा.
जर तुम्ही पायाला काळा धागा बांधला असेल तर दुसरा कोणताही धागा बांधू नये. दुसरा धागा बांधल्यास तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही.
पायाला काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनि ग्रह शक्तीशाली होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
याशिवाय पायाला काळा धागा बांधल्यास शनिदोषापासूनही मुक्ती मिळते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)