झाडांनी घराची शोभा वाढते आणि वातावरण ताजे राहाते. काही रोपटी घराच्या मुख्य द्वारावर लावणे फार शुभ मानले जाते.
चला तर घरात कोणती रोपटी लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनवर्षाव होतो ते जाणून घेऊया.
ज्या घरी तुळशीचे रोपटे असते ते घर सुख समृद्धीने भरलेले असते. तसेच ज्या घरी तुळशीचे रोपटे असते तेथे लक्ष्मी देवी वास करते.
मोगऱ्याचे रोपटे घरात सुगंध पसरवत नाही तर त्यामुळे घरात धनलाभही होतो.
घरात वाढलेलं मनी प्लांटचं झाडसुद्धा घरात धनाचे वेगवेगळे मार्ग उघडते.
फर्न घरात असणे फार शुभ मानले जाते. फर्न ट्रीला गुड चार्म असेही म्हटले जाते.
पाम ट्री घरात असणे फार शुभ मानले जाते. त्यामुळे घरात पॉझिटीव्ह वातावरण राहाते.