तुम्हीही 2024 सालासाठी संकल्प करत असाल तर आचार्य चाणक्य यांच्या या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
आचार्य चाणक्य त्यांच्या निती शास्त्राच्या 14 व्या अध्यायातील 5 व्या श्लोकात यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले आहेत.
कठोर परिश्रम करुन ज्ञान संपादन करुन यश प्राप्त करा. तेव्हाच तुम्ही दूषित जागेवर कमळाप्रमाणे फुलते. याचा अर्थ यशस्वी जीवनासाठी कठोर परिश्रम गरजेचं आहे.
2024 मध्ये योग्य व्यक्तीला दान करा. ज्या व्यक्तीला खरंच मदतीची गरज आहे त्यांना दान करा. त्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
तुमच्या हृदयातील रहस्य मूर्ख किंवा दुष्ट व्यक्तीला चुकूनही सांगू नका. 2024 मध्ये प्रत्येक काम गुप्तपणे करा. या कृत्याने निश्चितपणे यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
जगण्यासाठी धार्मिक कार्यही गरजेचं आहे. त्यामुळे 2024 मध्ये आधात्मिक गोष्टी करा. शास्त्राच्या ज्ञानाने तुम्ही जीवनात यशाची पाऊलं चढतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)