चाणक्य नीति: बुद्धीमान व्यक्तीने कधीच करु नयेत या चूका; भोगावे लागतात गंभीर परिणाम

आचार्य चाणक्य हे त्यांच्या नितीशास्त्राबरोबरच खासगी आयुष्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्यांसाठीही ओळखले जातात.

Swapnil Ghangale
Aug 03,2023

काय करावे? काय टाळावे?

चाणक्य यांनी रोजच्या आयुष्यामध्ये व्यक्तीने कसे वागावे, काय करावे, काय टाळावे यासंदर्भातील मार्गदर्शन केलं आहे. समाधानी आयुष्य जगण्यासाठी या गोष्टींचं अनुकरण आजही केलं जातं.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

चाणक्य यांनी बुद्धीमान व्यक्तीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही केलेलं आहे. चाणक्य नीतिमध्ये बुद्धिमान व्यक्तीने टाळव्यात अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात..

कधीच खोटं बोलू नये

बुद्धीमान व्यक्तीने कधीच खोटं बोलू नये असं चाणक्य सांगतात.

या 3 गोष्टी कराच

सुखी, सामाधानी राहण्यासाठी कायम खरं बोलावं. विचार करुन पैसा खर्च करावा. नाकारात्मक विचारांपासून दूर राहा, असं चाणक्य सांगतात.

या 2 व्यक्तींपासून सावधान

शक्तीशाली शत्रू आणि दुबळा मित्र कायमच त्रास देतात, असं चाणक्य सांगतात. त्यामुळेच अशा लोकांपासून दूर रहावं असं चाणक्य नीति सांगते.

उपाशी राहू नये कारण...

बुद्धीमान व्यक्तीने कधीच उपाशी राहू नये असंही चाणक्य सांगतात. यामागील मुख्य कारण म्हणजे भूक लागल्यावर त्याचा बुद्धीवर वाईट परिणाम होतो.

प्रतिमेवर नकारात्मक परिणाम

आपल्या बुद्धीवर परिणाम झाला तर त्या व्यक्तीच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होतो आणि चारचौघात त्याची प्रतिमा खराब होण्याची शक्यता वाढते.

तिथं बुद्धीमान व्यक्तीने थांबू नये

ज्या ठिकाणी मान, सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी बुद्धीमान व्यक्तीने थांबू नये, असं चाणक्य सांगतात.

अशा जागी बुद्धीमान व्यक्ती थांबत नाही

जेथे काही कमवण्याची संधी उपलब्ध नसते, हाती काहीच लागत नाही अशा जागी बुद्धीमान व्यक्ती थांबत नाही, असंही चाणक्य नीतिमध्ये नमूद केलं आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story