फक्त लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी
आज काल पती पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडण होतात. अगदी तुमचं नातं घटस्फोटापर्यंत जातं.
जर तुमचं नात तुटू नये आणि तुम्ही कायम एकत्र राहावं असं वाटतं असेल तर नवरा आणि बायकोने तीन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात.
त्यामुळे तुमचं नातं सात जन्म टिकाव असं तुम्हाला वाटत असेल तर अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य तीन गोष्टीवर आवर्जून करायला सांगितली आहे.
अनेक नाती ही गैरसमजमुळे तुटतात. बायको काय म्हणते हे नवऱ्याला तर नवरा काय म्हणतो ते पत्नीला समजत नाही. तेव्हा त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांना आपलं मत समजावून सांगा.
हो, विचारांवर नियंत्रण ठेवा. कारण हे विचार तुमच्या नात्यासाठी घातक ठरतात. तुम्हीच नेहमी बरोबर आणि त्यातून हट्टी स्वभाव यामुळे नात्यात ताण निर्माण होतो. त्यामुळे विचारांवर नियंत्रण ठेवा.
हो, हा नात्यामधील सर्वात घातक शत्रू आहे. क्षुल्लक कारणावरुन एकमेकांचे शाब्दिक अपमान केल्यामुळे नात्यात तणाव येतो. वारंवार शब्दांचा मारा झाला तर एकमेकांविषयी आदर, प्रेम राहत नाही. त्यामुळे नात्यात एकमेकांच्या भावना जपा आणि नात्याची काळजी घ्या.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)