दरिद्रता दूर करण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात दरिद्रधन स्तोत्राचे पठण करावे. यानंतर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
कुटुंबातील कोणताही सदस्य गंभीर आजाराने त्रस्त असेल तर त्यांनी सोमवारी शिवाला पंचामृताने अभिषेक करावा. असे मानले जाते की शिवाच्या कृपेने रोगापासून मुक्ती मिळते.
विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी 21 बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहा. यानंतर शिवलिंगावर अर्पण करा.
सोमवारी गरिबांना अन्नदान करा. असे केल्याने घरात अन्नपूर्णा सदैव वास करते. तसेच अन्नधान्याची कमतरता भासत नाही.
सोमवारी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून नियमित पूजा करा. असे केल्याने संपत्ती वाढते.
अपत्यप्राप्तीसाठी सोमवारी पिठाचे 11 शिवलिंग बनवावेत. यानंतर 11 वेळा अभिषेक करा.
सोमवारी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा. यामुळे पापांपासून मुक्ती मिळते. त्यासोबतच तुम्हाला आनंद मिळतो.
सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 1008 वेळा जप करा. यासोबतच शिवाचा रुद्राभिषेक करावा. हा उपाय केल्याने शिवाची कृपा होते. त्यामुळे अकाली मृत्यूचा धोका टळतो.
सोमवारी नंदी बैलाला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे सुख-समृद्धी वाढते. पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
सोमवारी भोलेनाथाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.