प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी
पती पत्नीमध्ये वाद असेल तर बेडरुममध्ये हत्तीची जोडी ठेवावी, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं. बेडरुममध्ये पांढरे हत्ती एकमेकांकडे तोंड करुन ठेवले पाहिजे.
दोन हत्तींच्या मध्ये बसलेली लक्ष्मी मातेचा फोटो हा तिजोरीच्या दारावर लावावा. त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. शिवाय चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घरातील तिजोरीत ठेवावा.
आर्थिक संकट टाळण्यासाठी हत्तीच्या पायाखाली माती ठेवा.
चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने, घरावरील वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होतो.
घराच्या दारावर वरती सोंड केलेले हत्ती लावल्यास घरात प्रेम व आनंदी राहतं.
घरातील वादविवाद व भांडणे मिटवण्यासाठी ३ हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावेत.
घराच्या उत्तर पूर्वेला चांदीचा हत्ती ठेवल्याने वास्तुशास्त्रीय दृष्ट्या खूप शुभ मानले जाते.
पितळ्याचे हत्ती बैठकीच्या खोलीत ठेवल्याने घरात शांतता आणि सौख्य नांदतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)