Garuda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत

Pravin Dabholkar
Aug 08,2023

कर्मांचे फळ

प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात.

श्वास

गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत.

रेषा

मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.

विचित्र गोष्टी

मृत्यू येण्याआधी व्यक्तीच्या स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात.

नाक

गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वत:चे नाक दिसणे बंद होते.

आत्मा

मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्या सभोवताली आत्मा जाणवू लागतो. हे त्याच्या पूर्वजांचे आत्मे असतात.

मृत नातेवाईक

जे त्याच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यात त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात. कारण त्याचा मृत नातेवाईक त्याच्या जवळ येणार असतो.

सावली

मृत्यू जवळ आला असेल तर ती व्यक्ती तेल किंवा पाण्यात आपली सावली पाहू शकत नाही. त्यामुळेच मृत्यूच्या वेळी माणसाची सावलीही साथ सोडते, असे म्हटले जाते.

अस्वीकरण

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story