हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्व आहे.यादिवशी नागदेवताची पूजा केली जाते. पण यादिवशी पोळी का बनवू नये हे तुम्हाला माहित आहे का?
यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 05.47 ते 08.27 पर्यंतचा राहील.
नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू वापरणं निषिद्ध मानलं जातं. अशावेळी रोटी बनवण्यासाठी तव्याचा वापर करणं अशुभ आहे.
शास्त्रानुसार तव्याला सापाचे कुंड मानले जाते. यादिवशी तव्याचा वापर केल्याने सर्पदेवाला राग येऊ शकतो.
तव्याला हे राहूचे प्रतिक मानलं जाते. या दिवशी पोळी बनवण्यासाठी तव्याचा वापर केल्यास कुंडलीत राहू ग्रहाचा प्रभाव वाढू शकतो.
नागपंचमीच्या दिवशी तव्यावर रोटी बनवल्याने आर्थिक कमतरता भासू शकते.त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.
नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे देखील निषिद्ध मानले जाते. याशिवाय चाकू,सुई इत्यादी धारदार वस्तूंचा वापर करणं टाळावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)