तुम्ही घरात 'या' दिशेला डस्टबिन ठेवता?

तिजोरीवर पडेल परिणाम


वास्तूशास्त्रात तुमच्या घराबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमाचं पालन केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतात, असं तज्ज्ञांचं म्हणं असतं.


वास्तूशास्त्रात दिशेला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही घरात कुठली वस्तू कुठल्या दिशेला ठेवली याला अतिशय महत्त्व आहे.


वास्तूशास्त्रात डस्टबिन कुठल्या दिशेला ठेवायचं याबद्दलही सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही चुकीच्या दिशेला ठेवल्यास तुमच्या घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.


त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार घरात कुठल्या दिशेला डस्टबिन ठेवायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात.


घरात डस्टबिन आग्नेय दिशेला ठेवल्यास आर्थिक संकट कोसळतं.


ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.


पूर्व आणि उत्तर दिशेला डस्टबिन ठेवल्यास घरात नैराश्य वातावरण निर्माण होतं. शिवाय कामात अडचणी येतात.


वास्तूशास्त्रानुसार डस्टबिन वायव्य आणि नैऋत्य दिशेला ठेवलं पाहिजे. नैऋत्य दिशा ही विसर्जनासाठी शुभ असतं, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.


डस्टबिन कधीही घराच्या बाहेर ठेवू नयेत ते कायम घरातच ठेवावं, असंही वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story