गरुड पुराण हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. म्हणूनच 18 महापुराणांमध्ये याला विशेष स्थान आहे.
घरातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यावर गरुड पुराणाचे पठण केले जाते .
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा लगेच नवीन शरीर घेतो. म्हणजे आत्मा दुसरा जन्म घेतो.
पण हे सर्व आत्म्यांसोबत घडत नाही. काही आत्म्यांना दुसरे शरीर धारण करण्यासाठी तीन दिवस आणि काहींना 10-13 दिवस लागतात.
तर कुणाचा दुसरा जन्म दीड महिना उलटूनही होतो.
असे काही आत्मे असतात ज्यांना भूत बनून भटकावे लागते.
मृत व्यक्तीचा दुसरा जन्म कोणत्या वयात आणि किती दिवसांनी होईल, हे त्याच्या कर्मावर आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या विधींवर अवलंबून असते. (ही माहिती गरूण पुरुणावर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )