कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर किंवा दूध चांदीच्या भांड्यात ठेवा. जर घरात एखादी व्यक्ती जुनाट आजाराने त्रस्त असेल तिला द्या.
रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा केल्याने आर्थिक फायदा होतो.
विष्णू सहस्त्रनाम, श्री सुक्त याचं पठण केलयामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे.
रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा केल्यामुळे पैशा हातात टिकून राहतो.
कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा केल्यामुळे घराची आर्थिक भरभराट होते.
घरात शांती राहवी म्हणून घरातील मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा.
रात्री देवी लक्ष्मीसमोर 4 वाती तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक अडचण दूर होते.
मानसिक शांततेसाठी कोजागरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात, शक्य नसल्यास रात्री 1 वाजेपर्यंत जागरण करा.
रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा, यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर चारमुखी दिवा लावा. या उपायामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, अशी मान्यता आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)