द्रोपदीने असा पती मागितला होता जो 14 गुणांनी परिपूर्ण असेल.
भगवान शंकराने द्रोपदीला वरदान दिले तेव्हाच तिचे भाग्य ठरले.
द्रोपदीने एक-एक वर्षाच्या अंतराने पांडवांच्या एक-एक मुलांना जन्म दिला.
द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरमध्ये जिंकले. कुंतीच्या सांगण्यानुसार 5 भावांची ती पत्नी झाली.
द्रोपदीचा युधिष्ठीराशी विवाह झाला जो धर्माचे प्रतिक होता. प्रतिविन्ध्य असे त्यांच्या मुलाचे नाव होते.
द्रोपदीचा भीमाशी विवाह झाला. जो जगातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होता. त्यांच्या मुलाचे नाव सुतसोम असे होते.
अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. त्यांच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते.
नकुला हा विश्वातील सर्वात सुंदर तरुण होता. त्यांच्या मुलाचे नाव शतानीक असे होते.
सहदेव हा सहनशील होता. श्रुतसेन असे दोघांच्या मुलाचे नाव होते.
अश्वत्थमाने पांडवांच्या शिबिरात आग लावली. ज्यामध्ये द्रोपदीच्या 5 मुलांचा झोपेतच मृत्यू झाला. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)