कुरुक्षेत्रात महाभारताचे युद्ध झाले होते. त्यात असा योद्धा होता ज्याच्या मृत्यूनंतर भगवान श्रीकृष्ण हा ओक्साबोक्शी रडला होता.
जेव्हा युद्धात कौरव सैन्याने पांडवांना वेठीस धरलं तेव्हा एका राजपुत्राचा बळी देण्यास सांगितलं गेलं.
यावेळी महान योद्धा अर्जुनचा मुलगा इरावण याने पुढाकार घेतला आणि त्याग करण्याची तयारी दर्शवली.
पण यात अजून एक अट होती. ती म्हणजे लग्न करुन मरायचं. त्यावेळी श्रीकृष्ण समोर आले आणि त्यांनी मोहिनीचं रुप धारण केलं.
या मोहिनी रुपात श्रीकृष्णाने इरावणाशी लग्न केलं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी काली मातेसमोर इरावणाचा बळी देण्यात आला.
या घटनेच्या वेळी मोहिनी रुपातील श्रीकृष्ण ओक्साबोक्शी रडले. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)