Pitru Paksha 2023

पितृ पक्षात 'या' 10 पैकी कोणतीही एक वस्तू करा दान

गाय दान

गायीचं दान सर्व दानांमध्ये सर्वात श्रेष्ठ दान धार्मिक शास्त्रात मानलं गेलं आहे. गायीचं दान केल्यामुळे सुख आणि संपत्ती लाभते.

तिळाचं दान

श्राद्धाच्या प्रत्येक विधीमध्ये तिळाला महत्त्व आहे. काळे तीन दान केल्यास संकट दूर होतं अशी मान्यता आहे.

तुपाचं दान

श्राद्धाच्या वेळी भांड्यात गायीचं तूप दान केल्यामुळे कुटुंबात शुभ ठरतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

धान्य दान

गहू आणि तांदूळ दान केल्यामुळे तुम्हाला अपेक्षित फळ लाभतं.

जमीन दान

पितृपक्ष काळात दुर्बळ किंवा गरीब व्यक्तीला जमीन दान केल्यास तुमच्या संपत्तीत भर पडतो, अशी मान्यता आहे. जर जमीन शक्य नसेल तर काही मातीच्या गुठळ्या ताटात ठेवून ब्राह्मणाला दान केल्यास फायदा होतो.

कपड्यांचं दान

धोतर आणि दुपट्ट्यासह दोन कपड्यांचं दान केल्यास घरात सुख समृद्धी नांदते.

चांदीचं दान

पितरांच्या आशीर्वादासाठी चांदीचं दान प्रभावी मानलं जातं.

गुळाचं दान

घरातील कलह, दारिद्र आणि धन प्राप्तीसाठी गुळाचं दान महत्त्वपूर्ण मानलं जातं.

सोन्याचं दान

कलह दूर करण्यासाठी सोनं दान करणे शुभ मानले जाते.

मिठाचं दान

पितरांच्या सुखासाठी मीठ दान करणं अतिशय शुभ मानले जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story