'या' 1 फुलाशिवाय पितरांना तर्पण अपूर्ण!
वैदिक ज्योतिषशास्त्रात पितृ पक्षात पिंड दान, श्राद्ध आणि तर्पणला अतिशय महत्त्व आहे. पिंड दानासाठी फुलांचा वापर केला जातो. पण त्यात एक फुलं अतिशय महत्त्वाचं असतं. त्या फुलाशिवाय पितरांना तर्पण पूर्ण मानलं जातं नाही आणि पूर्वज अतृप्त राहतात, असं शास्त्रात म्हणतात.
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीपासून पितृ पक्ष अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत पितृ पक्ष असतो.
यंदा 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. या काळात पूर्वजांसाठी पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण विधी केला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षाच्या काळात पितरांचं श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इत्यादी करण्यासाठी विशेष फुलाचा वापर केला जातो. हे इच्छेचं फूल म्हणून ओळखलं जातं.
पितृ पक्षात श्राद्ध आणि तर्पणमध्ये काशाची फुलं वापरली जातात. काश फुलाचा वापर शुभ मानला गेल्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे. त्याशिवाय मालती, जुही, चंपा यासह पांढर्या फुलांचा श्राद्ध पूजेत वापर केला जातो.
तसंच बेलपत्र, कदंब, करवीर, केवडा, मौलसिरी आणि लाल-काळ्या रंगाच्या फुलांचा वापर अशुभ मानला जातो. यासोबतच या काळात चुकूनही तुळशी आणि भृंगराजाचा वापर करु नये. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)