भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची

नक्की काळजी घ्या नाहीतर...

Aug 29,2023


श्रावणातील या पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधानाच्या दिवशी भद्राची सावली आहे.


त्यामुळे 30 ऑगस्टला रात्री 9 वाजेपासून 31 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत राखी बांधण्याचा मुहूर्त आहे.


भावाला राखी बांधताना बहिणींनी 'दिशेची' काळजी घ्यावी.


ज्योतिषशास्त्रानुसार जर योग्य विधी, मुहूर्त आणि दिशेला बसून राखी बांधली नाही तर त्याचं शुभ फल मिळतं नाही.


रक्षाबंधनाचे नियम पाळल्यास भावाचं नशीब चमकतं आणि आरोग्याला फायदा होता.


ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधताना भावाने उत्तर किंवा पूर्व दिशेला बसावे.


तर भावाला राखी बांधताना बहिणीचं चेहरा हा पश्चिम दिशेला असावा.


यंदा रात्री 9 नंतर मुहूर्त असल्यामुळे राखी बांधताना भावाचा चेहऱ्या हा पश्चिमेला असावा.


हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, पुरुषांच्या उजव्या बाजूला दैवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे शास्त्रानुसार भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story