शनि अमावस्येला जुळून येत आहेत 3 शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी करा 'हे' उपाय
शनिदेव हा कर्मदाता आहे. तो आपण केलेल्या कर्माची फळं देतो. चांगल्या कर्माला चांगली तर वाईट कर्माची वाईट शिक्षा देतो.
ज्यांच्यांवर शनिदेवाच्या साडेसाती, अडिचकी किंवा महादशेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
17 जूनला शनी अमावस्या (Shani Amavasya 2023) आहे. यादिवशी काही उपाय केल्यास साडेसाती, अडिचकी किंवा महादशेचा त्रास कमी होईल.
17 जूनला शनी अमावस्यासोबतच शनी वक्री स्थितीत जाणार आहे. या दुहेरी योग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करा. हनुमानजी प्रसन्न झाल्यास शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. सुंदरकांड आणि बजरंगबाण पठण केल्यास अतिशय लाभ होतो.
शनिदेवाचा बीज मंत्र ‘ओम शन्नो देवी रभिष्टया आपो भवनतु पीतये, शं योराभिश्रवंतु न:’ याचा जप करा. 23 हजार वेळा जप केल्याने शनीच्या साडेसाती आणि अडिचकीचा अशुभ प्रभाव दूर होतो.
आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा.काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घातल्याने अतिशय फायदा होईल. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )