आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उल्लेख चाणाक्य नितीमध्ये केलाय.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी, लक्ष्य प्राप्त करण्यासाठी निरोगी राहणे आवश्यक आहे.
यामुळेच चाणाक्यांनी भोजनावर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.
भोजनाबद्दल चाणाक्य काय सांगतात, हे जाणून घेऊया.
दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते.
पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात.
मासांहारापेक्षा तूप हे दहापट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात.