ब्रह्म मुहूर्तावर म्हणा 'हे' 3 चमत्कारिक श्लोक; स्वर्गाहून सुंदर होईल आयुष्य

Jan 16,2024

ब्रह्म मुहूर्त दिवसातील सर्वात चांगली वेळ समजली जाते. ब्रह्म मुहूर्त रोज पहाटे 4 ते 5.30 वाजेपर्यंत असतो.

ज्योतीषतज्ज्ञांच्या मते, ब्रह्म मुहूर्तावर उठून हे 3 श्लोक म्हटल्यास फक्त दिवस चांगला जात नाही, तर आयुष्यातही सुख-समृद्धी येते.

संस्कृत भाषेत लिहिण्यात आलेले हे श्लोक यश, बुद्धी आणि कल्याणाचं माध्यम आहे. या श्लोकचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या.

1) पहिला श्लोक

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले | विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ||

अर्थ

हे पृथ्वीमाते, तुझ्याकडे समुद्राच्या रुपात वस्त्र आहे आणि पर्वत तुझे पयोधर आहेत. हे विष्णूची पत्नी, तुम्हाला नमस्कार. माझ्या चरणांनी तुला होणाऱ्या स्पर्शासाठी कृपया माफ कर.

2) दुसरा श्लोक

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती | करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ||

अर्थ

हाताच्या सर्वात पुढील भागात लक्ष्मी, मधे सरस्वती आणि मूळ भागात ब्रम्हाचा निवास आहे. यासाठी सकाळी दोन्ही हातांनी दर्शन घ्या.

3) तिसरा श्लोक

ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी

अर्थ

हे ब्रह्मा, विष्णू, शिव तुम्हा तिघांमुळे ही सृष्टी चालते. हे तिन्ही लोकांचे स्वामी तुम्ही सूर्य, चंद्र, जमीन, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू सर्व ग्रहांना शांत ठेवा.

VIEW ALL

Read Next Story