वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बदल केल्यास त्याचा प्रभाव घरातील लोकांवर पडतो. अनेक जण घर घेतल्यानंतर वास्तुशास्त्रातज्ज्ञांकडून सल्ला घेतात.
वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरुमही एक महत्त्वाचा भाग आहे. बाथरुममध्येही वास्तुदोष निर्माण होतात, त्यामुळं घरात नकारात्मक उर्जा पसरु शकतात.
घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये म्हणून वास्तुनुसार बाथरुममध्ये मीठ ठेवावे. याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जणून घेऊया.
वास्तुनुसार काचेच्या भांड्यात रॉक सॉल्ट ठेवल्याने नकारात्मक उर्जा दूर होते. तसंच, आर्थिक तंगी असल्यास परिस्थितीत सुधार होतो.
बाथरुममध्ये काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरातील पैशाची चणचण दूर होते. तसंच, घरात सुख शांती नांदते व सकारात्मक उर्जा जाणवते.
खारट पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते, अशी पुरातन मान्यता आहे.
पितळेच्या भांड्यात क्रिस्टल मीठ ठेवा तसंच ही वाटी कोणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. मात्र हे मीठ सतत बदलत राहा
टॉयलेटमध्ये खडे मीठ टाकून ते फ्लश केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असे मानले जाते
वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी किंवा शनिवारी बाथरूममध्ये मीठ ठेवणे चांगले मानले जाते. त्यामुळं तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)