शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं?

Mar 03,2024

हिंदू धर्मात भगवान शंकराला विशेष महत्त्व आहे. सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे.

8 मार्चला महाशिवरात्रीचा महाउत्सव देशभरात साजरा करण्यात येणार आहे. शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं जाणून घ्या.

धार्मिक शास्त्रानुसार सोमवारी शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात, असं सांगण्यात आलंय.

सोमवारी तुपाचा दिवा लावल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिव मंदिरात तुपाचा दिवा लावल्यास फायदा होतो.

लवकर लग्नासाठी शिवमंदिरात जाऊन तुपाचा लावल्यास शंकर भगवान आणि माता पार्वती प्रसन्न होते.

खूप प्रयत्न करुनही कामात यश मिळतं नाही अशावेळी शंकर मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा.

शिवमंदिरात तुपाचा दिवा लावून धनप्राप्ती होते असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story