शनिला न्यायाची देवता असं म्हटलं जातं
शनि देव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याचा न्याय करतात, अशी मान्यता आहे
ज्या राशींवर शनिची वक्रदृष्टी पडते त्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात
एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यास शनिला अडीच वर्षे लागतात
शनीसध्या स्वतःच्या कुंभ राशीतच विराजमान आहेत. १७ जून २०२३ला रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी ते राशीवर वक्री होतील
कुंभ राशीवर ४ नोव्हेंबरपर्यंत शनीची वक्रदृष्टी राहणार आहे. याचा प्रभाव काही राशींवर पडणार आहे.
शनिच्या वर्कदृष्टीमुळं चार राशींना सतर्क राहावे लागणार आहे
शनिच्या वक्री होण्यामुळं मेष राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यांना अनेक प्रकारच्या कठिण समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनिची वक्री चाल अशुभ ठरणार आहे. त्यांच्या आर्थिक समस्या वाढणार आहेत
तुळ राशीच्या लोकांना मानसिक व आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच, कौटुंबिक वाद-विवाद होतील
कुंभ राशीसाठी हा काळ थोडा कष्टदायी असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.