संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनात कोणताही चुकीचा विचार येऊ देऊ नका. मोठ्यांचा आदर करा.
गणपतीची पूजा करताना आपलं मन स्वच्छ ठेवा. इतरांशी चांगलं वागा, त्यांचा अपमान करु नका.
संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत.
संकष्टी चतुर्थीला मांस. मद्य यांचं सेवन करु नये. घऱातच सात्विक जेवण करा.
संकष्टी चतुर्थीला ब्राह्मणांना जेवायला देणं शुभ मानलं जातं. त्यांचाही आदर करा. अपमान होईल असं वागू नका,
संकष्टी चतुर्थीला पशु, पक्ष्यांना त्रास देऊ नका. याउलट या दिवशी त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे.
संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करताना तुळशीच्या पानाचा वापर करु नये. असं करणं अशुभ मानलं जातं.
यावर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी 8 मे रोजी येत आहे. यादिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात तसंच इच्छा पूर्ण होतात. मात्र या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे.