हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चेच्या वेळी घंटीचा वापर केला जातो. असं म्हणतात की या घंटानादाशिवाय पूजा अपूर्णच राहते.
पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटीवर सहसा एका देवतेची प्रतीमा पाहायला मिळते. ही असते गरुडदेवता.
अशी मान्यता आहे की, गरुडदेवता वाहनाच्या स्वरुपात घंटीवर विराजमान होऊन भक्तांचं मागणं देवापर्यंत पोहोचवते.
गरुडदेवतेला हिंदू धर्मात पूजनीय स्थान प्राप्त आहे. परिणामी घंटानाद करतानाच मनातील इच्छा देवापुढं मागितल्यास गरुडदेवता ती ऐकतात अशी धारणा आहे.
असंही म्हटलं जातं की गरुडदेवता विराजमान असणाऱ्या घंटानादानं आजुबाजूची नकारात्मक उर्जा नाहीशी होते.