शिवलिंगावर लवंग का अर्पण करतात?

Mar 05,2024

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात शिवलिंगाची विशिष्ट पूजा सांगण्यात आली आहे.

त्याशिवाय महादेवाला विशेष वस्तू अर्पण केल्यास तुमच्या समस्या दूर होतात, अशी शास्त्रात सांगण्यात आलंय.

लवंगाचा वापर अनेक पूजेमध्ये केला जातो. शिवलिंगावर लवंग का अर्पण करतात आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.

शिवलिंगावर लवंग अर्पण करणे शुभ मानले जाते. लवंग हे शिवशक्तीचं प्रतिक मानलं जातं. शिवाय लवंग पराकोटीचे कारकही आहे.

आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर नियमितपणे लवंग अर्पण केल्यास फायदा होतो असं म्हणतात.

त्याशिवाय शिवलिंगावर लवंग अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याशिवाय आयुष्यातील सर्व संकट दूर होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story