संध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण

Jun 09,2023

संध्याकाळी मनाई

Forbidden To Sweep Evening In House : संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते.

धार्मिक कारण

प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही धार्मिक कारण सांगण्यात येते.

हे शास्त्रीय कारण

संध्याकाळी झाडू न मारण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे, पूर्वीचे लोक कंदील किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात कामे करत असत. यावेळी जर एखादी मौल्यवान वस्तू घरात कुठे पडली, तर ती शोधणे अत्यंत कठीण होते. त्यावेळी झाडू मारली तर ही वस्तू घराबाहेर जाण्याची भीती होती. या कारणांमुळे, पूर्वीच्या लोकांनी हा नियम केला आणि संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई केली.

घरातील ऊर्जा

लोक सकाळीच घर स्वच्छ करुन सजवत असतात. त्यामुळे दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सूर्यास्तानंतर जर घर झाडून घेतले तर ही सकारात्मक ऊर्जा झाडूसोबत घरातून बाहेर जाते, असा एक समज आहे.

वास्तुशास्त्रानुसार..

वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की, संध्याकाळी किंवा रात्री घरात झाडू मारल्याने घरात दरिद्रता येते.

प्रगतीत अडथळा

वास्तुशास्त्रात असे सांगतले आहे की संध्याकाळी झाडू मारल्याने आणि घरात कचरा साचल्याने घराच्या प्रगतीत अडथळे येतात.

लक्ष्मी होते नाराज

संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते.

VIEW ALL

Read Next Story