हिंदू धर्मात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नद्यांना पवित्र व शुद्ध मानले जाते. गंगा नदीप्रमाणेच नर्मदा नदीला देखील पुजले जाते.
नर्मदा नदीच्या तटावरील व नदीतील प्रत्येक दगडात भगवान शंकराचे अस्तित्व असल्याचे मानण्यात येते. त्यामागे एक कथा आहे ती जाणून घेऊया.
नर्मदा नदीने हजारो वर्षे ब्रह्मदेवाची तपस्या केली होती. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी नर्मदा नदीला वर मागण्यास सांगितले.
नर्मदा नदीने वरदान मागितले की, मला गंगा नदीच्या समान करावे. तेव्हा ब्रह्मादेवाने सांगितले की कोणताही देवता शिवाची, कोण्या पुरुषाने विष्णुची बरोबरी केल्यास व कोणत्या नगराने काशीची बरोबरी केली तरच दुसरी एखादी नदी गंगासमान होऊ शकते.
ब्रह्मदेवाचे ऐकून नर्मदा नदीने वरदानाचे त्याग केले आणि काशीमध्ये जाऊन शिवलिंगाची स्थापना करुन घोर तपस्या केली
तेव्हा भगवान शंकराने प्रसन्न होऊन दर्शन दिले त्याचबरोबर वरदान देखील दिले की, नदीच्या तटावर जितके पण दगड असतील त्यांना शिवलिंगाचे स्वरुप प्राप्त होईल.
तेव्हापासून नर्मदा का हर कंकर शंकर, असं म्हटलं जाऊ लागले.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)