5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताबरोबरच अन्य देशांच्या संघांची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र ही स्पर्धा कोण जिंकणार याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
असं असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज अॅडम गिलक्रिस्टने उपांत्यफेरीमध्ये कोणते 4 संघ जातील याबद्दल भाकित व्यक्त केलं आहे.
गिलक्रिस्टने नेमक्या कोणत्या 4 संघांची नावं घेतली आहेत पाहूयात. ही यादी वाचून तुम्ही त्याच्या मताशी सहमत आहात का कमेंट करु नक्की सांगा
अॅडम गिलक्रिस्टने उपांत्यफेरीत जाणारा पहिला संघ म्हणून भारतीय संघाला पसंती दर्शवली आहे.
त्याचबरोबर गिलक्रिस्टने भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानही उपांत्यफेरी गाठेल असं म्हटलं आहे.
या 2 संघांबरोबरच गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलियाचा संघही उपांत्यफेरी गाठण्यात यशस्वी ठरेल असं म्हटलं आहे.
उपांत्यफेरीत प्रवेश करणारा अंतिम संघ म्हणून गिलक्रिस्टने इंग्लंडच्या संघाला पसंती दिली आहे.
"भारत आणि पाकिस्तानचे संघ नक्कीच उपांत्यफेरीत जातील," असं गिलक्रिस्ट म्हणाला.
तसेच, "अन्य 2 संघांबद्दल बोलायचं झाल्यास ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडही उपांत्यफेरीत प्रवेश करतील," असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.