एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होता. त्याआधी पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत भारताने फायनलमध्ये धडक मारलीय.

Sep 15,2023


भारत आणि बांगलादेशदरम्यान हा सामना कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने एक इतिहास रचला


रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या शमीम हुसेनला बाद करत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला.


एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट आणि 2 हजाराहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी करणारा जडेजा हा दुसरा भारतीय ठरलाय.


याआधी कपिल देव यांच्या नावावर हा विक्रम जमा आहे. कपिल देव यांनी 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट आणि 3783 धावा केल्या आहेत.


रविंद्र जडेजाने 182 एकदिवस सामन्यातच 200 विकेटचा पार केला आहे. तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 2578 धावा जमा आहेत.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा गाठणारा जडेजा हा सातवा भारतीय गोलंदाज आहे. याआधी अनिल कुंबळे (337), जवागल श्रीनाथ (315), जहीर खान (282), हरभजन सिंग (269) हे गोलंदाज आहेत.

VIEW ALL

Read Next Story