आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या.
दरम्यान विराट कोहलीचं हे 47 वं शतक असून, सचिन तेंडुलकरची बरोबरी कऱण्यासाठी दोन शतकांची गरज आहे.
विराट कोहलीने फक्त 278 सामन्यांमध्ये 13 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यासह विराट कोहली सर्वात वेगाने 13 हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे.
सचिन तेंडुलकरला हा टप्पा गाठण्यासाठी 321 सामन्यांची वाट पाहावी लागली होती.
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरनंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने 341 डावांमध्ये 13 हजार धावा केल्या होत्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे. त्याने 363 सामन्यात ही कामगिरी केली होती.
पाचव्या क्रमांवर श्रीलंकेचा माजी स्फोटक फलंदाज सनथ जयसुर्या आहे. त्याने 416 सामन्यात 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.