आशिया चषक स्पर्धेमधील सुपर-4 च्या भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माला लय गवसली.
रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावलं.
रोहित शर्माने 49 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या.
रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान 6 चौकार आणि 4 षटकार लगावले.
सामन्यातील 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 121 वर असताना शादाब खानच्या फिरकी गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला.
रोहित शर्माने अगदी शाहीन शाह आफ्रिदीपासून शादाबपर्यंत सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर निराश होऊन पव्हेलियनमध्ये परतला.
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानामध्ये फलंदाजीसाठी आला.
मात्र मैदानात येताना दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आजूबाजूने गेले तेव्हा विराटने रोहितचं अनोख्या पद्धतीने कौतुक केलं.
विराटने रोहितच्या खांद्यावर थम्बस अप करत हळूच शब्बासकी देतात त्याप्रमाणे आपल्या मुठीने स्पर्श करत रोहितच्या खेळीचं कौतुक केलं.
विराट आणि रोहित दरम्यानच्या अबोल संवादाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांमधील कथित वादाची कायम चर्चा असते मात्र हा फोटो दोघांमधील बॉण्डींग दाखवतोय असं अनेकांनी म्हटलं आहे.