ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँडदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना एडिनबर्गमध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तुफान फलंदाजी केली. पावर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने 113 धावा केल्या.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पावर प्लेमधला ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. याआधी पावर प्लेमध्ये 102 धावांचा विक्रम होता.
टी20 सामन्याच्या पहिल्याच षटकात जॅक फ्रेजर मॅकगर्क बाद झाला. पण यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्शने धावांची बरसात केली.
हेड आणि मार्शने सहा षटकात 113 धावांची भागिदारी केली. हेड ने 25 चेंडूत 80 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
हेडने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हे संयुक्तरित्या वेगवान अर्धशतक ठरलं आहे. याआधी हा विक्रम मार्कस स्टोईनिसच्या नावावर आहे.
तर कर्णधार मिचेल मार्शने अवघ्या 12 चेंडूत 39 धावा केल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला.