कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेर शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सेहवागने अवघ्या 278 चेंडूत तिहेरी शतक झळकावलं होतं.
या यादीत आता इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा समावेश झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात हॅरी ब्रुकने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत 310 धवात तिहेरी शतक ठोकलं.
वेगवान तिहेरी शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचे वॅली हैमंड यांचा समावेश आहे. 1933 मध्ये हैमंड यांनी ऑकलंडच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 355 चेंडूत तिहेरी शतक केलं होतं.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवर आणि तुफान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅथ्यू हेडनने पर्थ कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध 2003 मध्ये 362 चेंडूत तिहेरी शतक झळकावलं होतं.
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर दोन तिहेरी शतकांचा समावेश आहे. मुल्तान कसोटीत सेहवागने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत 364 चेंडूत तिहेरी शतक ठोकलं होतं.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 27 फलंदाजांनी तिहेरी शतक करण्याचा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 तिहेरी शतकं नोंदवली गेली आहेत.