भारत आणि इंग्लंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
हा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
या दरम्यान रोहित शर्माचा नवा लूक व्हायरल झाला आहे. राजकोटला जाण्याआधी रोहितने हेयरस्टाईल केली आहे.
रोहित शर्माच्या चाहत्यांना त्याचा हा लूक चांगलाच पसंतीस पडला आहे. नव्या लूकमधील रोहितचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रोहित शर्माने मुंबईतला प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमकडे हेअर स्टाईल केली आहे.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात चार डावात 22.50 च्या अॅव्हरेजने 90 धावा केल्या आहेत.
या मालिकेत भारताच्या यशस्वी जयस्वालच्या नावावर सर्वाधिक धावा जमा आहेत. जयस्वालने 2 सामन्यात 321 धावा केल्या आहेत.